India

UP Election | उत्तर प्रदेशमध्ये आज सहाव्या टप्प्यात मतदान; योगी आदित्यनाथांचं भवितव्य ठरवणारं

Published by : left

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज ५७ जागांसाठी मतदान होणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यासारख्या राजकीय दिग्गजांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, सहाव्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता संपला आणि मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी रिंगणात असलेल्या ६७६ उमेदवारांमध्ये गोरखपूर शहरमधून आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवत असलेले योगी आदित्यनाथ, तमकुही राज मतदारसंघातून लढणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षात सामील होण्यासाठी भाजपाचे मंत्रीपद सोडणारे आणि फाजिलनगरमधून लढणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचा समावेश आहे.

सहाव्या टप्प्यात पूर्वांचलमधील आंबेडकर नगर ते गोरखपूरपर्यंतच्या जागांवर राजकीय संघर्ष होणार आहे.सहाव्या टप्प्यात एकूण ६७६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तर, सहाव्या टप्प्यामधील ५७ विधानसभा मतदारसंघांपैकी ११ राखीव आहेत, जे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत.

समाजवादी पक्षाने भाजपाचे दिवंगत नेते उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभे केले आहे. तर, आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद हे देखील योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...