विकास माने | बीड | कोरोना नियम शिथील झाल्या नंतर सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णया नंतर विद्यार्थांनी पहिला दिवस मिरवणूक काढून मोठ्या ऊत्साहाने साजरा केला.
आज शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. बीडच्या गेवराई तालुक्यातील रामपुरी इथल्या गावात, विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं. तब्बल दोन वर्षांच्या कालावधी नंतर जिल्ह्यातील तीन हजार शाळा सुरू झाल्या आहेत. सुरुवाती पासूनच ऑनलाइन शिक्षणात अडथळा येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. माञ आज आखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग भरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे मनोबल वाढवे याकरिता ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली. तर काही विद्यार्थी घोडेस्वारी करत शाळेत पोहोचले.