पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडत आहे. याचीच लगबग सध्या दिल्लीत सुरु आहे. त्यातच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे. हर्ष वर्धन यांनी नेमका राजीनामा का दिला याचे कारण समोर आले आहे.
देशात सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. या विस्ताराआधी सरकारमधील चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच आता राजीनाम्याच्या यादीत आणखीन एक नाव चर्चेत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन यांना दुसरं खात दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपील पाटील यांचं नाव निश्चित मानलं जातंय. तसंच दिंडोरीच्या खासदार भारती पवार, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांचंही नाव चर्चेत आहे. दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळते आणि इतर राज्यांतून कुणाला प्रतिनिधित्व मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.