Budget 2022

Union Budget 2022 Live Updates: आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही – अर्थमंत्री

Published by : Lokshahi News
https://youtu.be/qPMh8VvIvis

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. दरम्यान देशाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार कोणत्या कोणत्या घटकांना दिलासा देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

  • आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही
  • टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही
  • कॉर्पोरेट टॅक्स 18 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणलाय
  • दिव्यांगांना कर सवलत देणार
  • इन्कम टॅक्स रिटर्नमधील सुसूत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी

2022-23 मध्ये आरबीआयचं डिजिटल चलन येणार

  • परदेशी विद्यापीठांना भारतात संस्था उभारण्यास परवानगी देणार
  • लघू उद्योग 2 लाख कोटी
  • सौरउर्जेसाठी 19 हजार 50 कोटींची तरतूद
  • महिलांसाठी पोषण 2.0 योजना
  • कोळशापासून रसायनं निर्मिती करण्यासाठी 4 पायलट प्रोजेक्ट
  • उत्तरेतील सीमेलगतच्या गावांचा विकास करू
  • जीडीपी 9.2 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज
  • विद्यार्थ्यांसाठी 100 ई-विद्या चॅनेल्स
  • एबीजीसी सेक्टरमध्ये युवांना नोकरी
  • कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर
  • विशेष आर्थिक क्षेत्रात नियम बदलणार
  • सौरउर्जेला आगामी काळात भर देणार
  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर भर
  • मालमत्तेच्या व्यवहारासाठी मोठी घोषणा
  • गावागावात ब्रॉडबँड
  • पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम
  • 2022 मध्ये ५-जी सुविधा देणार
  • 'व्हायब्रंट व्हिलेज' योजनेची घोषणा
  • टेलिकॉम क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार
  • आवास योजना 48 हजार कोटी
  • पाणीपुरवठा 60 हजार कोटी
  • कृषी 2.37 लाख कोटी
  • प्रदूषणमुक्तीसाठी ई-वाहनांना प्राधान्य
  • 2 लाख आधुनिक अंगणवाड्या
  • 700 नव्या ई-लॅब
  • ईशान्य भारतातील राज्यांसाठी १५०० कोटींची तरतू
  • देशातील ५ मोठ्या नद्या जोडण्याचा प्रस्ताव
  • पैशांची देवाण-घेवाण अधिक सुलभ करणार
  • पोस्ट ऑफिस बँकांशी जोडणार
  • ई-पासपोर्ट अधिक सोपं करणार
  • एमएसपीवर खरेदी केली जाणार – अर्थमंत्री
  • पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये
  • कृषी विद्यापीठांना प्रोत्साहन देणार
  • स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण
  • महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न
  • मिशन शक्ती सक्षम अंगणवाडी योजना
  • शेतकऱ्यांसाठी व्यापक पॅकेज बनवणार
  • नदी जोड प्रकल्पासाठी मोदी सरकारचा प्रयत्न
  • खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न
  • हायवे विस्तारासाठी 20 हजार कोटी रुपये
  • शेतकऱ्यांसाठी व्यापक पॅकेज बनवणार
  • केमिकल मुक्त उत्पादन वाढवण्यावर भर देणार
  • एका वर्षात 25 हजार किमी महामार्ग बांधणार
  • पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर
  • रेल्वे आणि रस्ते निर्माणासाठी मोठी गुंतवणूक
  • झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
  • गरीबांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कटिबद्ध
  • अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांचा पाया भरणार असेल
  • आरोग्य क्षेत्रात भरघोस तरतूद करणार
  • अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे- अर्थमंत्री
  • सर्वांचा विकास हे आमचं लक्ष्य- अर्थमंत्री
  • गरीबांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कटिबद्ध
  • LIC चा आयपीओ लवकरच येणार
  • 30 लाख जास्तीच्या नोकऱ्या देण्याची क्षमता
  • या अर्थसंकल्पात विकासाला प्रोत्साहन मिळणार
  • गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधांवर भर
  • सर्वांचं कल्याण हेच मोदी सरकारचं ध्येय – अर्थमंत्री
  • 30 लाख अतिरिक्त रोजगार देणार- अर्थमंत्री
  • 100 वर्षांसाठी पायाभूत सुविधा उभारणार
  • युवकांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणार
  • एलआयीसीचा आयपीओ लवकर येणार- अर्थमंत्री
  • बजेटमध्ये विकासाला प्राधान्य दिलंय- अर्थमंत्री
  • आपली अर्थव्यवस्था जोमाने वेग पकडत आहे – अर्थमंत्री
  • आगामी 25 वर्षांचा पाया हे बजेट रचणार आहे – अर्थमंत्री
  • 9.2 टक्के देशाचा विकासदर असेल, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम – अर्थमंत्री
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करणार चौथा अर्थसंकल्प
  • वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड यांचे अर्थ मंत्रालयात पोहोचले
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंत्रालयात दाखल
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयातून रवाना, डॉ. भागवत कराड आणि अर्थ मंत्रालयातील अधिकारी वर्ग सोबत, संसदेत टॅबद्वारे सादर करणार यंदाचा अर्थसंकल्प
  • अर्थसंकल्प सादर होणार असल्याने शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स ५८२ अंकांनी वधारला

बजेटच्या प्रती संसदेत दाखल झाल्या आहेत. यावेळी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल; बजेटआधी कॅबिनेट बैठकीला सुरुवात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असून अर्थसंकल्पावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha