कोरोना महामारीच्या काळात सर्वांनाच अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी . सध्या देशातील युवकांपुढे सध्या बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनला आहे. भारतात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलेले आहे. राजस्थान सरकारनं बेरोजगार असणाऱ्या युवकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री युवा संबल योजनेअंतर्गत राजस्थानमधील बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देण्यात येणार आहे. महिला, दिव्यांक आणि तृतीयपंथी यांना 4500 रुपये, युवकांना 4000 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी युवकांना 3000 हजार तर महिला आणि इतरांना 3500 बेरोजगार भत्ता मिळत होता.
बेरोजगारी भत्ता मिळण्याच्या अटी:
- बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार राजस्थानचा मूळ निवासी असला पाहिजे.
- राजस्थानच्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावं.
- राजस्थान बाहेरील विद्यापीठात शिक्षण घेतलेली महिला देखील याचा लाभ घेऊ शकते त्यासाठी तिचा विवाह राजस्थानच्या नागरिकाशी झालेला असावा.
- अर्जदार खासगी क्षेत्रात कार्यरत असू नये.
- बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील युवकाचं वय 30 तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याचं वय 35 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
- बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी प्रथम स्थानिक रोजगार कार्यालयात नोंदणी करणं बंधनकारक आहे.
- युवकांनी सर्वप्रथम राजस्थान सरकारच्या Department of Skill, Employment विभागाच्या वेबसाईटवर भेट द्या.