अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षानंतर तालिबाननं ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. दरम्यान, युक्रेनच्या एका विमानाचं काबूलमध्ये अपहरण करुन इराणला नेल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी ही माहिती दिली आणि सांगितलं की, युक्रेनियन विमान आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबूलला पोहोचलं होतं, पण अज्ञात लोकांनी ह्या विमानांचे अपहरण केले .
हायजॅक करुन इराणला नेलं विमान
युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन म्हणाले, 'युक्रेनियन नागरिकांना अफगाणिस्तानातून आपल्या देशात आणण्यासाठी एक विमान काबूलला पोहोचलं होतं. पण, अज्ञात लोकांनी हे विमान हायजॅक करुन ते इराणला नेलं. युक्रेनियन विमानाचं रविवारी अपहरण करण्यात आलं होतं आणि मंगळवारी हे विमान इराणला नेण्यात आल. दरम्यान, विमान कुणी हायजॅक केलं, याची माहिती मिळू शकली नाही.