देशात नवीन माहिती तंत्रज्ञान नियम लागू झाल्यानंतर सर्वच सोशल माध्यमांना ते बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या नवीन नियमांमुळे अनेक सोशल माध्यमांचा आक्षेप होता. यामध्ये ट्विटरही आघाडीवर होते. आता याच ट्विटरने थेट केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार वाद रंगणार आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटवर आपल्याला लॉगइन करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. मी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याचं मला सांगण्यात आलं आणि नंतर मात्र मला त्यांनी अॅक्सेस दिला," असं पहिल्या ट्विटमध्ये रवि शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत.
"ट्विटरचा (नवीन नियमांसंदर्भातील) उदासीनपणा आणि अनियंत्रित कृतीविरोधात आवाज उठवणारी माझी विधाने, विशेषत: टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या माझ्या मुलाखतीच्या क्लिप्स मी शेअर केल्याने आणि त्याचे परिणामकारक प्रभाव दिसून आल्याने या गोष्टी घटल्याचं रवी शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.