India

राहुल गांधींनंतर ‘या’ काँग्रेस नेत्यांची टि्वटर खाती निलंबित

Published by : Lokshahi News

काही दिवसांपूर्वी टि्वटरनं राहुल गांधी यांचं टि्वटर खातं बंद केलं होतं. यानंतर आता ट्विटरनं मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांची खाती ब्लॉक करण्यात आली आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आली आहेत असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एका नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे ट्विट केली होती, जिची कथितपणे बलात्कार आणि हत्या झाली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) राहुल गांधी यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले होते.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे