Marathwada

बीडमध्ये अनोखा विवाह! बाळू आणि तृतीयपंथी सपना अडकले लग्नबेडीत

Published by : Pankaj Prabhakar Rane

विकास माने : बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू आज विवाह बंधनात अडकले आहेत. बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे बाळू आणि तृतीयपंथी सपना आजपासून आयुष्यभरासाठी सोबती बनले आहेत.

पारंपारिक धार्मिक विधीनुसार सपना आणि बाळूचा विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण मंगलाष्टिका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील लोकांनी सपनाचं कन्यादान केलं.

सपना-बाळूची प्रेमकहाणी

बाळू आणि सपनाची प्रेमकहाणी संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी सुरू झाली. ही प्रेमकहाणी सत्यात उतरत उद्या सपना आणि बाळू आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार आहेत.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती