टूलकिट प्रकरणात दिशा रवीसोबत सहआरोपी असलेल्या शांतनु मुलुकने दिल्लीच्या कोर्टात जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात उद्या सुनावणी करावी अशी मागणी देखील त्याने यावेळी केली आहे.
टूलकिट प्रकरणात २२ वर्षाची पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला शुक्रवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शनिवारी न्यायालयाने दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. दिशा रवी खलिस्तान समर्थक संघटनेशी संबंधि त असल्याचे सांगून दिल्ली पोलिसांनी तिच्या जामीन अर्जाला विरोध केला. तसेचं न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, उद्या मंगळवारी न्यायालय निर्णय देणार आहे.
याच प्रकरणात सहआरोपी असलेले शांतनू मुळूकने दिल्लीच्या कोर्टात जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.