शेतकरी आंदोलना संदर्भात टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
दिशा रवीचा पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयासमोर आज हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने पोलिसांनी मागणी फेटाळून लावत दिशाला जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दिशाला दिलासा मिळाला आहे.
दिशा रवी यांना जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टाने तिला चालू तपासणीत सहकार्य करण्याचे आदेश दिले. तसेच परवानगीशिवाय देश सोडता येणार नसल्याचेही बजावले आहे.