टोक्यो ऑल्मिपिक भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचला.जगभरातून त्याच कौतुक होतंय. नीरज चोप्राच्या हरियाणातील गावातही सध्या उत्साहाचं वातावरण असून दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केलं जाणार आहे. मुंबईत त्याचं भव्य स्वागत होणार आहे अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली. दरम्यान यावेळी त्यांनी "मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो"असंही उद्धव ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताने टोक्यो ऑल्मिपिकमध्ये एक सुवर्ण, दौन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.