रुस आणि युक्रेन युद्धाचे परिणान जगभरात झाले आहेत. भारतावर त्याचे परिणाम होते. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे. भारतातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात परराष्ट्रमंत्री जयशंकर (foran minister jaishankar)यांनी युक्रेनसह इतर देशांशी चर्चा सुरु केली आहे. राज्यातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर(vijay wadettiwar) माहिती देत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परीषदेमध्ये 'महाराष्ट्रातील किती लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत ह्याची माहिती मिळवत आहोत' असं ते म्हणाले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार:
- महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
- 320 विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क झाला आहे.
- इमर्जन्सी संपर्क केंद्र सुरू केलं आहे: 022-2202 7990 यावर लोक संपर्क करू शकतात किंवा या क्रमांकावर 9321 58 71 43 Whatsapp करू शकतात किंवा controlroom@maharshtra.gov.in या पत्त्यावर ई-मेल करू शकतात.
- जी जी मदत हवी असेल त्या त्या मदतीसाठी सरकार तयार आहे.
- या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी आम्ही केली आहे.
- काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत.
- महाराष्ट्रातूनही विमान जाईल , हा अधिकार केंद्राचा आहे.
- विद्यार्थ्यांचा थेट संपर्क पालकांशी झाला असून आमच्याशी थेट संपर्क झालेला नाही.
- विमानाच्या तिकिटात पैसे कमी पडत असतील।किंवा कोणतीही मदत असेल सरकारद्वारे केली जाईल.