उदय चक्रधर, गोंदीया | ज्यांना मुलं बाळं नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही असे सूचक वक्तव्य करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. रशिया युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या वेदनांबाबत बोलताना, नाना पटोलेंनी ऑपरेशन गंगाची खिल्ली उडवत मोदींवर चौफेर टीका केली आहे.
युक्रेन मध्ये युद्ध सुरु होणार होते असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात असताना भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते. मात्र युद्धा आधीच युक्रेन मध्ये असलेल्या बाकी देशांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशांनी त्यांना स्वदेशात घेऊन जाण्याची सोय केली असल्याचे तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र आपल्या देशातून कुठलीही मदत युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच आपल्या देशातील केंद्रीय दूतावास सुद्धा विद्यार्थ्यांचा फोन उचलत नाही, विद्यार्थ्यांचे म्हणण सुद्धा ऐकत नसल्याचा आरोप पटोलेंनी केला. तसेच मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोन वर बोललो त्यांचे व्हिडीओ पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोलले असून त्याच्या कडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही.
मोदींना सदबुद्धी मिळो
नाना पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकार म्हणते तुम्ही काही गडबड करू नका आम्ही सगळं बघून घेऊ, मात्र आज ज्यांचे मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत, त्यांच्या कुटूंबियांवर काय वेदना होत असतील ?, ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना ते काय कळणार? असा प्रश्न करत पटोलेंनी मोदींवर टीका केली. केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोक युक्रेन मधून आणण्यात कमी पडले आहे. हे सत्य आहे आणि त्यांनी हे मान्य केलं पाहिजे, असेही ते म्हणाले. तर जी बंकरखाली मुलं आहेत. त्या ठिकाणाच्या मुलींचे व्हिडीओ पहिले तर त्या मुलीनं सांगितलं की या ठिकाणाहून मुली गायब होत आहे .हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे व्हावेत. सगळ्या मुलांना देशात परत आणले पाहिजे अशी सदबुद्धी त्यांना मिळो अशी आशा मी करीत असल्याचे नाना पाटोले म्हणाले आहेत.