Covid-19 updates

Covid 19: चीनमधील ‘हे’ शहर पुन्हा लॉकडाऊन; संपुर्ण जगाची चिंता वाढली

Published by : Vikrant Shinde

2020 साली वर्षाच्या सुरूवातीलाच आलेल्या कोरोना (Covid-19) नावाच्या रोगाने संपुर्ण जगाला हादरवून सोडले होते. साधारण 2 वर्षे संपुर्ण जगभरात ह्या रोगाने मृत्यूचं थैमान घातलं होतं. देशातील बहूतांश देशांमध्ये लॉकडाऊन (LockDown) लावण्यात आले होते. त्यामुळे, अनेक देशांची अर्थव्यवस्था (Economy) देखील कोलमडली आहे.

आता कुठे कोरोनाच्या प्रसारापासुन जगाला थोडा दिलासा मिळतोय असं वाटत असतानाच. कोरोनोचं उगमस्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये (China) कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगानं होत असल्याचं समजतंय. 2020 मध्येही कोरोनाचा प्रसार व्हायला सुरूवात ही चीनमधूनच झाली असल्याचं समजलं जातं.

चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन:
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने काही दिवसांपुर्वी चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. मात्र आता चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायमध्येही (Shanghai) लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. ह्या शहराची लोकसंख्या साधारण 2.5 कोटी (2.5 Crores) इतकी आहे.

कोरोनाचा उगमस्थान समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना पसरताना दिसत असल्याने आता संपूर्ण जगाचीच धाकधूक वाढली आहे.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...