कोरोना काळात महागाईने त्रस्त झालेल्या केंद्रातील लाखो कर्मचाऱ्यांना केंद्रसरकारने खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारने आता २६ जून पासून महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता. त्यासाठी केंद्राची बैठक होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल ३२,४०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता.
सातवे वेतन आयोग लागू झाल्यापासून अनेक दिवस कर्मचारी महागाई भत्त्याची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना लकरच हे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.
१ जुलै नंतर कर्मचाऱ्याचा भत्ता १७ टक्क्यावरुन २८ टक्के होणार आहे.म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचा महागाई भत्ता एकत्र मिळेल. केंद्र सरकार गेल्या वर्षी थांबवलेल्या महागाई भत्त्याचे ३ हप्ते कर्मचाऱ्यांना देणार आहे.
किती वाढणार पगार –
पगारवाढीबद्दल बोलायचं झाल्यास पे-मॅट्रिक्स नुसार, कमीत कमी पगार १८००० रुपये आहे. यामध्ये १५ टक्के महागाई भत्ता जोडला जाईल, अशी आशा आहे. म्हणजेच दर महिन्याला तुमचे २७०० रुपये वाढतील. म्हणजे तुमच्या पगारात वर्षाकाठी ३२४०० रुपयांची वाढ होईल. ही वाढ महागाई भत्त्याच्या रुपात असेल.