कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याबरोबरच बिहार आणि उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगेच्या पात्रात अचानक मृतदेह तरंगाताना दिसू लागले. त्यावरून मोदी आणि योगी सरकारवर विरोधकांच्या टीकेचे धनीही ठरले.
उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचं निदर्शनास आलं होतं. यावरून मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचं आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, गंगेत सापडलेल्या मृतदेहावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांचं प्रसारमाध्यमांनी केलेलं वार्तांकन हा अजेंड्याचाच भाग होता, असा आरोप त्यांनी केला.