इम्रान खान Team Lokshahi
International

इम्रान खान यांची अग्निपरीक्षा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने मतदानात सहभागी होण्याची घोषणा

Published by : Team Lokshahi

आजचा दिवस हा पाकिस्तानच्या (Pakistan) भविष्यातील महत्वाचा ठरणार आहे. आज पाकिस्तानच्या संसदेत वझीर-ए-आलम विरोधात अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांच्या पक्षाने भूमिका बदलली असून त्यांनी मतदानात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर संसदेत व संसदेबाहेर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये (capital Islamabad) कलम 144 लागू करण्यात आली आहे. ही कलम पुढील आदेश येईपर्यंत 2 महिने सुरू राहणार आहे. 3 एप्रिल रोजी मेट्रो बस सेवा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संसदेसह (Parliament) प्रमुख इमारती असलेल्या रेड झोन परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून त्या भागात प्रमुख रस्त्यांवर कंटेनर लावण्यात आले आहेत. हा रस्ता सर्वसामान्यांसाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

त्यांच्या माझ्या जिवाला धोका असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मी घाबरलो नाही तसेच स्वतंत्र आणि लोकशाही पाकिस्तानसाठी आपला लढा सुरूच ठेवतील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी सांगितले.

बलाढ्य सैन्याने तीन पर्याय दिले आहेत - अविश्वास प्रस्तावावरील मतदानाला सामोरे जाणे, मुदतीपूर्वी निवडणुका घेणे किंवा पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे. अशी माहिती रविवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात नॅशनल असेंब्लीमध्ये (National Assembly) अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी खान यांनी दिली.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha