राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली जात आहे. आता ही ज्योत इंडिया गेट ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) येथे विलीन होऊन ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही ज्योत आज दुपारी ३.३० वाजता युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन होणार आहे.
दोन्ही स्मारकांमधील अंतर हे अर्धा किमी आहे. २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण केले होते. येथे 25,942 सैनिकांची नावे सुवर्णाक्षरात कोरण्यात आली आहेत. अमर जवान ज्योती इंडिया गेटच्या खाली आहे. १९२१ मध्ये इंग्रजांनी इंडिया गेट बांधले होते. पहिल्या विश्व युद्धात 84,000 सैनिकांच्या आठवणीत हे स्मारक बांधण्यात आले होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश वेगळा करण्यात आला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या युद्धातील 3,843 शहीद जवानांची आठवण म्हणून इंडिया गेटखाली अमर ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्धाटन केले होते.
१९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या ३,८४३ भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम १९७२ मध्ये ज्योत प्रकाशित झाली होती. यानंतर २६ फेब्रुवारी १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्योतीचे उद्घाटन केले होते. केंद्र सरकारने २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले होते. १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या २६,४६६ भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.