education

अकरावी प्रवेशप्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर दहावीचा निकाल लागला. आता विद्यार्थांचे संपूर्ण लक्ष अकरावीच्या प्रवेशाकडे लागलेले असतानाच एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर १ ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर २ ऑगस्टपासून महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून भरलेली माहिती प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी लिंक खुली केली जाणार आहे.

विद्यार्थी स्वत: अथवा पालकांच्या मदतीने किंवा शाळा आणि मार्गदर्शन केंद्राची मदत घेऊन अर्ज करू शकतील. प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रथम ऑनलाइन नोंदणी करावे लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी मिळवणे व पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज भाग भरावा.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी