Uncategorized

‘ही’ कंपनी लवकरच लाँच करतेयं नवीन तीन व्हेरियंट

Published by : Lokshahi News

भारतात Redmi Note 11T 5G स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती मनी कंट्रोल यांनी दिली आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच रेडमी फोनचे तीन व्हेरियंट लाँच करणार आहे. त्यामध्ये बेस मॉडेल 6GB RAM+64GB स्टोरेज दिला जाणार आहे.

रेडमी नोड 11टी 5जी च्या 6GB+128GB स्टोरेजची सुरुवाती किंमत 17,999 रुपये आणि 8GB+128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये असण्याची शक्यता आहे. याची टक्कर शाओमी रिअलमीच्या 8s ला टक्कर देणार आहे. हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षात सुरुवातीला 17,999 रुपयांना लाँच केला होता.

टिप्सटर योगेश बरार यांनी मनीकंट्रोलच्या सुत्रांद्वारे सांगण्यात आलेल्या बेस मॉडेलची लीक किंमतीची पुष्टी केली आहे. त्याचसोबत कंपनीने भारतात आपल्या रेडमी नोट 11टी 5जी लाँच इवेंटमध्ये इअरबड्स सुद्धा लाँच करणार आहे. परंतु इअरबर्ड्सबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.

शाओमीने रेडमी नोट 11टी 5जी च्या लीक झालेल्या किंमतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन भारतात 30 नोव्हेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. असे ही बोलले जात आहे की, हा स्मार्टफोन पोको M4 Pro 5G प्रमाणेच असेल.

रेडमी नोट 11 5जी चे रिब्रँन्ड वर्जन आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या लॉन्चिंग किंवा किंमतीबद्दल कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. जी 33W फास्ट चार्जिंगसह येणार आहे.
दरम्यान, कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास 11T 5G मध्ये डुअल सेंसर सेटअप मिळणार आहे. तसेच 50 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर दिला जाऊ शकतो.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news