संदीप गायकवाड | वसई पूर्वेच्या मधूबन परिसरात बिल्डर ने खोदून ठेवलेल्या खड्यात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूर्व शिर्डी नगर येथून वसईच्या मधूबन परिसरात फिरण्यासाठी आला होता.त्यांनतर तिथे तो पोहायला गेला असताना त्या खड्ड्यात बुडून त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समजले.
करण तिवारी (वय16) असे बुडालेल्या मुलाचे नाव असून तो नालासोपारा पूर्व शिर्डी नगर येथील रहिवासी होता. आज सायंकाळी 4 च्या सुमारास 8 ते 10 मुलांचा ग्रुप हा नालासोपारा पूर्व शिर्डी नगर येथून वसईच्या मधूबन परिसरात फिरण्यासाठी आला होता. बिल्डर ने बिल्डिंग कंट्रक्शन साठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. त्याच पाण्यात मुलांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता.पाण्याचा अंदाज न आल्याने यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे तर इतर मुलं सुखरूप आहेत.
वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.मात्र वसईच्या मधुबन परिसरामध्ये मोठमोठे कंट्रक्शन सुरू आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपायोजना बिल्डरांकडून त्याठिकाणी राबवली नसल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. अशा बिल्डरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.