गजानन वाणी, हिंगोली | हिंगोली जिल्ह्यात (Hingoli News) दहावीत शिकणाऱ्या एका तरूणाचा कूकरच्या झालेल्या स्फोटात (Cooker Explosion) मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अविनाश कांबळे असे तरूणाचे नाव आहे. विशेष म्हणजे या घटनेत अविनाश हा एकमेव घरातील कर्ता कमावता होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.अविनाशच्या दोन लहान बहिणी दोन आई,त्यापैकी एक अपंग आई आणि आजोबा यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर आता बनला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) कहाकर बुद्रुक येथील कांबळे कुटुंबीय भिकाजी कांबळे हे या घरातील कुटुंब प्रमुख मल्हारी कांबळे हा त्यांचा मुलगा होता.मल्हारी कांबळे यांना दोन बायका आहेत.दोन बायकांचा हा संसार,घरात आठरा विसावे दारिद्र्य,राहायला नीट घर नाही,शेती नाही, ना कमाईचे कोणते साधन नाही. त्यात मल्हारी कांबळे यांचे काही दिवसापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. यामुळे घरातील कर्ता म्हणून कुटूंबाची जबाबदारी अविनाशच्या खांद्यावर आली.
वयोवृद्ध आजोबा दोन आई,दोन बहिणी यांचे पालन पोषण करत अविनाश 10वी मध्ये शिकत होता.दिवसा शाळा आणि रात्री रोजंदारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अविनाश 10 वीची परीक्षा देऊन रात्री हळद शिजवण्यासाठी रोजंदारीवर कामा वर गेला होता.अचानक हळद शिजवायच्या कुकरची शिट्टी लॉक झाली आणि कूकरचा स्फोट झाला. या स्फोटात कुकरमधील उकळलेले पाणी अविनाशच्या अंगावर पडले. यात अविनाश 90 टक्के भाजला. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी अकोला येथिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारा दरम्यान अविनशचा मृत्यू झाला. अविनाशच्या या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.दोन लहान बहिणी,दोन आई त्यापैकी एक अपंग आई आणि आजोबा यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.