तंत्रज्ञान

Xiaomi ने लिपस्टिक सारखी डिझाइन असलेली पॉवर बँक केली लॉन्च; ज्याची किंमत आहे एवढी स्वस्त

Published by : Siddhi Naringrekar

Xiaomi ने आपली नवीन पॉवर बँक Xiaomi Lipstick Power लाँच केली आहे. नवीन Xiaomi पॉवर बँक एका अनोख्या आकारात लॉन्च करण्यात आली आहे जी लिपस्टिक सारखी दिसते. नवीन लॉन्च केलेली पॉवर बँक कुठेही घेऊन जाणे सोपे आहे. नवीन परवडणाऱ्या Xiaomi लिपस्टिक पॉवर बँकेचे परिमाण 30.6 x 30.6 x 94.5mm आहेत. ही पॉवर बँक 129 युआन (सुमारे 1,462 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Xiaomi च्या या डिवाइस मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. पोर्टेबल असल्याने ते सहजपणे कुठेही नेले जाऊ शकते. हे उपकरण 20W च्या आउटपुट पॉवरला सपोर्ट करते. या पॉवर बँकेसोबत टाइप-सी इंटरफेस आहे जो द्वि-मार्गी जलद चार्जिंग, 13.5W इनपुटसह येतो. Xiaomi लिपस्टिक पॉवर बँकसह चार्जिंग केबल येते. ही पॉवर बँक ओव्हरहाटिंग किंवा शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी उपयोगात येते. 5 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात काम करू शकते. Xiaomi लिपस्टिक पॉवर बँक सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे आणि ती भारतात उपलब्ध करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

याचसोबतच Xiaomi ने Xiaomi Civi 2 मिड-बजेट स्मार्टफोन देखील लॉन्च केला आहे. हा फोन 6.55 इंच फुलएचडी + एमोलेड डिस्प्ले सह येतो. स्क्रीनचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर, 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये 32MP प्राइमरी आणि अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर देण्यात आले आहेत.

Badlapur Sexual Assault: बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर

Pune International Airport: पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे' नाव; राज्य सरकारचा निर्णय

Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...