iPhone ची किंमत त्यांच्या कलर व्हेरिएंटनुसार बदलत जाते. त्यामुळे जर तुम्ही एका विशिष्ट रंगाचा आयफोन घेतला तर तुमची मोठी बचत होऊ शकते. फ्लिपकार्टवर तुम्ही नुकताच लाँच झालेला iPhone SE 2020 मॉडेल फक्त 16999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. iPhone SE 2020 ची ही किंमत फ्लिपकार्टवरील डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँक ऑफर्सनंतर शक्य आहे. विशेष म्हणजे तुम्हाला फ्लिपकार्टवर iPhone SE 2020 RED व्हेरिएंटची निवड करावी लागेल.
iPhone SE (Red, 64 GB) भारतात 39,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा डिवाइस 24% डिस्काउंटनंतर 29,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनवर 13 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्ही तुमचा जुना फोन देऊन 13,000 रुपयांपर्यंची अतिरिक्त सूट मिळवू शकता. त्यामुळे हा फोन फक्त 16,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. सोबत आणखी मोफत सुविधा आणि बँक ऑफर्स फ्लिपकार्टवर मिळत आहेत.
iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.