तंत्रज्ञान

इंटरनेटशिवाय तुम्ही UPI द्वारे करू शकता पेमेंट; जाणून घ्या, सविस्तर…

Published by : Lokshahi News

आम्ही तुम्हाला इंटरनेटशिवाय UPI व्यवहार कसे करायचे, याबद्दल माहिती देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, तुमचा नंबर UPI व्यवहारांसाठी BHIM अॅपवर रजिस्टर्ड असला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही त्याचा वापर करू शकाल. BHIM अॅपवर UPI व्यवहारांसाठी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या डायलरवर जाऊन USSD कोड *99# डायल करावा लागेल. त्यानंतर कॉल ऑप्शनवर क्लिक करा.

तुमचा फोन तुम्हाला एक पॉप-अप मेनू दाखवेल. यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील. येथे तुम्हाला बॅलन्स चेक करण्यापासून ते UPI पिन मॅनेज करण्यापर्यंतचा ऑप्शन मिळेल. पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला सेंड मनीच्या ऑप्शनवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे आहेत याची माहिती द्यावी लागेल. यामध्ये UPI आयडी व्यतिरिक्त तुम्ही बँक अकाउंट डिटेल्स देखील वापरू शकता. डिटेल्स भरल्यानंतर, तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम निवडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला Send वर ​​क्लिक करावे लागेल.

पुढील स्टेपमध्ये तुम्हाला Remark विचारले जाईल. तुम्ही 1 प्रेस करून स्किप करू शकता. यानंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला UPI पिन द्यावा लागेल. तुम्ही पिन देताच पैसे ट्रान्सफर केले जातील. येथे तुम्हाला UPI पिनमध्ये फक्त BHIM अॅपवर रजिस्टर्ड पिन वापरावा लागेल.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय