मुंबई | ट्विटरला नवे सीईओ मिळाल्यानंतर लगेच काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत.
नवीन नियमांनुसार, यूजर्सच्या परवानगीशिवाय अन्य लोकं त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करु शकणार नाहीत. शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.
ट्विटरने काय म्हटले? :
"नव्या नियमांच्या अंतर्गत जे लोकं पब्लिक फीगर नाहीत ते लोकं ट्विटरला त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ हटवण्याबाबत सांगू शकणार आहेत. जे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट केले आहेत. मात्र, हे धोरण त्या लोकांसाठी नाही जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांचे ट्विट्स सार्वजनिक हितासाठी शेअर केले जाऊ शकते. दरम्यान, ट्विटरच्या मते खाजगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानं एखाद्या व्यक्तिच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो. त्यामुळं त्या व्यक्तिचं भावनिक किंवा शारीरिक नुकसान होऊ शकतं.