अलीकडेच, व्हॉट्सॲपने व्हॉईस नोट्ससाठी ट्रान्स्क्राइब फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. आता, एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की इन्स्टंट मेसेजिंग ॲप भाषा पॅक वापरून संदेशांचे भाषांतर करण्याच्या वैशिष्ट्यावर काम करत आहे . व्हॉट्सॲप गुगल भाषांतर थेट चॅटमध्ये समाकलित करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये संदेशांचे अखंडपणे भाषांतर करता येईल.
हे फीचर गुगलच्या लाइव्ह ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने काम करणार आहे. तुम्हाला कोणत्या व्यक्तिसोबत बोलताना भाषेची अडचण येत असेल, तर आता टेंशन घेण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपच्या नव्या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तिसोबत कोणत्याही भाषेत संवाद साधू शकता.
WhatsApp च्या या नव्या फीचरबाबत WABetaInfo ने माहिती दिली आहे. याबाबत WABetaInfo ने ट्विटरवर एक पोस्ट देखील केली आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपचे वर एक नवीन लाईव्ह ट्रान्सलेशन फीचर लाँच केलं जात आहे. WABetaInfo काही स्क्रीनशॉट केले आहेत. यानुसार, कोणत्याही मॅसेजचे भाषांतर करण्यासाठी, युजर्सना लाईव्ह ट्रान्सलेशनवर टॅप करावे लागेल. यानंतर लाइव्ह ट्रान्सलेशन फीचरद्वारे कोणत्याही मॅसेजचे भाषांतर करता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक मॅसेजचे भाषांतर करू शकता.