Admin
तंत्रज्ञान

या कंपनीची नवीन वैशिष्ट्यांसह नवीन पॉवरफुल स्कूटर, 1 लिटर पेट्रोलमध्ये 52.6km धावेल

सुझुकीने जर्मनीतील इंटरमोट कोलोन इंटरनॅशनल मोटरसायकल आणि स्कूटर फेअरमध्ये नवीन Burgmann Street 125EX सादर केले.

Published by : Siddhi Naringrekar

सुझुकीने जर्मनीतील इंटरमोट कोलोन इंटरनॅशनल मोटरसायकल आणि स्कूटर फेअरमध्ये नवीन Burgmann Street 125EX सादर केले. देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या 125cc स्कूटरपैकी ही एक आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतात Avenis 125 लाँच केली होती. ज्याची सुरुवातीची किंमत 86,700 रुपये होती. या स्पोर्टी स्टाइल स्कूटरने TVS Ntorq शी स्पर्धा केली.

Burgman Street 125EX ही एक प्रीमियम स्कूटर आहे, ज्याला मॅक्सी-स्टाईल बॉडी डिझाइन देण्यात आले आहे. यात शार्प पॅनल्स आहेत, जे याला स्पोर्टी प्रोफाइल देण्यात मदत करतात. काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये एलईडी हेडलाइट आणि एलईडी पोझिशन लाइट, एलईडी रिअर कॉम्बिनेशन लाइट, बॉडी-माउंटेड विंडशील्ड, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, यूएसबी चार्जिंग पोर्ट, मोठा 21.5-लिटर अंडर-सीट स्टोरेज, मोठा फूटबोर्ड, अॅल्युमिनियम पॅसेंजर फूटरेस्ट, आरामदायी सीट्स यांचा समावेश आहे. आणि स्टायलिश सायलेन्सर दिलेला आहे.

Burgman Street 125EX चे इंजिन आणि कार्यप्रदर्शन हे उत्कृष्ट बनवते. यात बहुधा SEP इंजिन वापरले होते, जे अॅड्रेस 125 आणि Avenis 125 सह केले गेले होते. Burgman Street 125EX ही SEP अल्फा इंजिन असलेली सुझुकीची पहिली दुचाकी आहे. SEP अल्फा 52.6kmpl ची उच्च इंधन कार्यक्षमता देते.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result