तंत्रज्ञान

Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोबाईलवरील डेटा चोरीला जाण्यासारख्या घटना आजकाल सर्रास पाहायला मिळतात. अशातच आता हॅकर्सनं आपली नजर Telegram या अ‍ॅपकडे वळवली आहे. वृत्तांनुसार हॅकर्स टेलिग्राम अ‍ॅपच्या बॉटचा वापर करून फेसबुक युझर्सची संपूर्ण माहिती अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर आली आहे.

२०१९ मध्ये एका रिसर्चरनं एका अनसिक्यॉर्ड सर्व्हरची ओळख पटवली होती. या सर्व्हरवर जवळपास ४२ कोटी रेकॉर्ड्स उपलब्ध होते. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटमधील १५ कोटी युझर्सचा डेटाही होता. यासाठी हॅकर्सनं टेलिग्राम अ‍ॅपचा वापर केला होता. सहजरित्या फेसबुक युझर्सच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी टेलिग्राम बॉटचा वापर केला होता.

रिसर्चने १९ देशांच्या युझर्सचा डेटा अ‍ॅक्सेस करत असल्याचा दावा केला आहे. जे लोकं आपला क्रमांक प्रायव्हेट ठेवतात त्या युझर्सचा डेटा या बॉटला अ‍ॅक्सेस करणं शक्य नसल्याचं एका चाचणीतून समोर आलं आहे. जे फेसबुक अकाऊंट्स डेटा लीकचं संकट संपल्यानंतर तयार केलेत अशा अशा अकाऊंट्सना कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आली आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण