मोटोरोला इंडियाने भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto E7 Power लाँच केला आहे. Moto E7 Power हा फोन भारतात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे.
- Moto E7 Power मध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे.
- फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर, 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
- फोनचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच पुढील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. कॅमेरासाठी पोट्रेट, पॅनोरमा, फेस ब्युटी असे अनेक मोड्स देण्यात आले आहेत.
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल.
- फोनला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी 14 तासांचा व्हिडिओ प्ले बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.
- Moto E7 Power हा फोन भारतात दोन व्हेरिअंटमध्ये लाँच झालाय. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 7 हजार 499 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 299 रुपये आहे.
- हा फोन भारतात २६ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.