Royal Enfield Team Lokshahi
तंत्रज्ञान

आता येणार ‘Royal Enfield’ ची इलेक्ट्रिक बाईक...

बाईक्सचे प्रोटोटाईपही तयार

Published by : Saurabh Gondhali

TVS, Hero, Ather आणि BMW सारखे मोठे वाहन निर्माते येणाऱ्या काही महिन्यांत आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स भारतात लॉन्च करणार आहेत. तर आता या शर्यतीत कडवी टक्कर देण्यासाठी रॉयल एनफील्डनेही ( Royal Enfield) कंबर कसली आहे.

भारत आणि परदेशी बाजारपेठांमध्ये रॉयल एनफील्डच्या इलेक्ट्रिक बाइक्स पोहोचवण्यासाठी प्रोडक्शन लाईन तयार करण्यात आली असल्याचे रॉयल एनफील्डचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ लाल यांनी म्हटले आहे. पर्यावरण, लोकांच्या भविष्याची चिंता, याबरोबरच सरकारच्या व्हिजनवर काम करताना चेंन्नईची ही कंपनी लवकरात लवकर बाइक्सच्या इलेक्ट्रिफिकेशनचे काम करेल. याशिवाय, रॉयल एनफील्डने इलेक्ट्रिक बाईक्सचे प्रोटोटाईपही तयार करून ठेवले आहेत. याचे उत्पादन लवकरात लवकर सुरू होईल, असे विनोद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनी या नव्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार करेल. तसेच हिच्यासोबत लेटेस्ट फिचर्सदेखील देण्यात येतील.

रॉयल एनफील्डने 2023 मध्ये अनेक इलेक्ट्रिक मोटारसायकल्स तयार करण्याचा प्लॅन बनवला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या बाईकसोबत 8 ते 10 किलोवॅट-आवर बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. हिला दमदार इलेक्ट्रिक मोटार असेल. मार्केटमधील ट्रेंड पाहता या बाईकची मोटार 40 बीएचपी एवढ्या शक्तीची आणि 100 एनएम पीक टॉर्क क्षमतेची असू शकते, असा अंदाज आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल; जनतेचा कौल कोणाला मिळणार?

Maharashtra Vidhan Sabha Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?