लोकशाही न्यूज नेटवर्क | स्मार्टफोन मेकर कंपनी रिअलमी आपले 5 जी स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिअलमी कंपनीने जाहिर केले की, कंपनी भारतात अपकमिंग टेक्नोलॉजी घेऊन येण्यास सज्ज झाली असून युजर्सला मोठा फायदा होणार आहे.
20,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे स्मार्टफोन 5 जी टेक्नोलॉजीसाठी युजर्सला अधिक किंमत मोजावी लागू नये, अशी आमची इच्छा असल्याचे सीईओ माधव सेठ यांनी स्पष्ट केले. आम्ही आमच्या युजर्सला पॉवर मॅनेजमेंट, डिस्प्ले ऑप्टिमायझेशन, कॅमेरा सपोर्ट, गेमिंग परफॉर्मन्स आणि कंज्युमर फ्युचर रेडी 5 जी देऊ इच्छित आहोत.
भारतातील स्मार्टफोन बाजारात 10 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे, तर 5 जी शिपमेंट्समध्ये या वर्षात 30 दशलक्ष युनिटपर्यंत वाढ दिसून येईल. रिअल मी X7 5G भारतातील पहिला 7nm मीडियाटेक डायमेंसिटी 800U 5G चिपसेट असून यात 5जी ड्युअल सिम देणार असल्याचे आल्याचे सांगण्यात आले आहे.