लोकशाही न्यूज नेटवर्क | देशातील लिडिंग डिजिटल पेमेंट सर्विस प्लॅटफॉर्म Paytm ने एक नवीन सर्विस लाँच करण्यात आली आहे. या सर्विसचे नाव इंस्टेंट पर्सनल लोन सर्विस असे असून कंपनीची ही सर्विस लोकांपर्यंत पेटीएमची क्रेडिट सर्विस पोहोचण्यासाठी आणली आहे.
कंपनीची इंस्टेंट पर्सनल लोन सर्विसचा वापर व्यक्ती वर्षभरात कधीही करू शकतो. यामध्ये व्यक्ती सुट्टीच्या दिवशी सुद्धा अर्ज करू शकतो.
Paytm इंस्टेंट पर्सनल लोन सर्विस :
कंपनीकडून या सर्विस अंतर्गत NBFC आणि बँकांकडून लोन दिले जाणार आहे.
कंपनीच्या या सर्विसमुळे छोट्या शहरात आणि गावातील व्यक्तींना सशक्त बनवले जावू शकते.
जे बँकेंपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना मदत मिळू शकते. पेटीएमने लोन अॅप्लिकेशनसाठी पूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे.
त्यामुळे फिजिकल डॉक्यूमेंटजी गरज पडणार नाही. ही सर्विस पेटीएमच्या टेक प्लॅटफ़ॉर्मवर बनवण्यात आली आहे.
जी बँक आणि NBFC ला केवळ २ मिनिटात लोन अॅप्लिकेशन पूर्ण करता येवू शकते.
नवीन इंस्टेंट पर्सनल लोन योजना अंतर्गत पेटीएम २ लाखांपर्यंत लोन पगार धारकांना, छोट्या व्यापाऱ्यांना आणि प्रोफेशन्सल यांना उपलब्ध करणार आहे.