Oppo | Smartphone team lokshahi
तंत्रज्ञान

Oppo चा नवा स्मार्टफोन लॉन्च, मिळणार 12 GB रॅम आणि लेटेस्ट प्रोसेसर

जाणून घ्या Oppo चे इतर फीचर्स

Published by : Shubham Tate

चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने बाजारात Oppo A97 5G लॉन्च केला आहे. हा फोन 48 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरासह येतोय. यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 12 GB RAM सह 256 GB स्टोरेज आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे.

Oppo A97 5G किंमत

Oppo ने सध्या फक्त देशांतर्गत बाजारात Oppo A97 5G लॉन्च केला आहे. या फोनच्या 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,999 युआन (सुमारे 23,600 भारतीय रुपये) आहे. हे चीनी ई-व्यावसायिक वेबसाइट Jd.com वर प्री-बुकिंग केला जाऊ शकतो. त्याची विक्री 15 जुलैपासून सुरू होणार आहे. Oppo A97 5G डीप सी ब्लू आणि क्वाएट नाईट ब्लॅक या दोन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Oppo A97 5G चे तपशील

Oppo A97 5G मध्ये Android 12 आधारित ColorOS 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. Oppo A97 5G मध्ये 6.66-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे, त्याचे रिझोल्यूशन (1,080x2,020) आहे. डिस्प्लेवर AI चे स्मार्ट आय प्रोटेक्शन फीचर देण्यात आले आहे. या फोनमध्ये Octa core MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये 12 GB रॅम आहे, जी 19 GB पर्यंत वाढवता येते.

Oppo A97 5G कॅमेरा

Oppo A97 5G मध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे, सेन्सर 48 मेगापिक्सेल आहे. दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

Oppo A97 5G बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की एका चार्जवर, ती 15 तास सतत व्हिडिओ प्ले करू शकते. फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर आहेत आणि BASS सुधारण्यासाठी Dirac टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, 3.5mm हेडफोन आणि USB Type-C ला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी