Netflix  Team Lokshahi
तंत्रज्ञान

आता कराल मनसोक्त मनोरंजन : Netflix चे प्लॅन स्वस्त होणार

नेटफ्लिक्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींच्या विरोधात आहे. कंपनीकडून येत असलेल्या जाहिरात सदस्यताचा प्लॅन सध्या सुरु असलेल्या प्लॅनच्या व्यतिरिक्त आहेत.

Published by : Team Lokshahi

सतत कमी होणारे युजर आणि पहिल्या तिमहीचे निराशाजनक प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसांत लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix शो अगदी कमी खर्चात पाहू शकतील. नेटफ्लिक्सने मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे.

नेटफ्लिक्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींच्या विरोधात आहे. कंपनीकडून येत असलेल्या जाहिरात सदस्यताचा प्लॅन सध्या सुरु असलेल्या प्लॅनच्या व्यतिरिक्त आहेत. Netflix ने एप्रिलमध्ये सांगितले की, जाहिरात असलेला प्लॅन लॉन्च करण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी खर्च येईल.

नवीन Netflix योजना कधी येतील?

Netflix चा नवीन प्लॅन 2022 च्या अखेरीस येऊ शकतात. नुकतीच न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस नवीन योजना लॉन्च करण्याचा विचार करत आहे. परंतु ही योजना केवळ निवडक देशांमध्येच असेल की सर्वत्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आता कोणत्या OTT जाहिरात सपोर्टेड योजना आहेत?

सध्या भारतात Disney Hotstar, Voot, Sony Liv, G5, Discovery Plus, MX Player सारखे OTT प्लॅटफॉर्म आहेत, जे जाहिराती चालवतात. या सर्व प्लॅटफॉर्मच्या जाहिराती खूपच स्वस्त आहेत. उदाहरणार्थ, डिस्ने हॉटस्टरचा वार्षिक प्लॅन फक्त 899 रुपये आहे. यामध्ये जाहिरातमुक्त चित्रपट आणि शो बघता येतात.

Netflix योजना किती स्वस्त असतील?

नेटफ्लिक्स भारतात आल्यापासून त्याला स्पर्धात्मक किंमतींचा सामना करावा लागत आहे. Disney+ Hotstar, Amazon Prime Video, Sony LiV आणि ZEE5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरून Netflix ला कठीण स्पर्धा मिळत आहे. उदाहरणार्थ, Disney Hotstar च्या प्रीमियम वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत 1,499 रुपये आहे, तर Netflix च्या HD स्ट्रीमिंग प्लॅनची ​​किंमत 499 रुपये प्रति महिना आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी