Motorolla G22 
तंत्रज्ञान

मोटोरोला लाँच करणार iphone सारखा स्मार्टफोन; किंमत व फीचर्स जाणून घ्या

Published by : Akash Kukade

मोटोरोला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार आहे. मोटो जी 22 बाजारात येत असून या फोनची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. तसेच याचा डिस्प्ले Apple च्या मोबाइल सारखा आहे.

Apple च्या एज च्या डिजाईन सारखीच डिजाईन मोटो ने दिली आहे. या मोबाईलला 4 GB रॅम, 5000 mAH बॅटरी, 90 HZ रिफ्रेश रेट, 50 MP कॅमेरा ही स्पेसिफिकेशन्स आहेत.

Moto G22 ची किंमत

Moto G22 स्मार्टफोन स्टायलिश डिजाईनसह 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं फोनचा एकच व्हेरिएंट सादर केला आहे, ज्याची किंमत फक्त 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Moto G22 स्मार्टफोन 13 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून तीन रंगात विकत घेता येईल.

Moto G22 चे फिचर्स

मोटो जी 22 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी 37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यांत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

Moto G 22 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 20वॉट फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह पावर बॅकअप देण्यास मदत करते.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result