तंत्रज्ञान

मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच

Published by : Lokshahi News

मोटोरोलाने Edge 20 सीरिज आज भारतात सादर करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Motorola ने Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion असे 5G स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यातील एज 20 स्मार्टफोन भारतातील सर्वात हलका आणि स्लिम 5G स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर मोटोरोला एज 20 फ्युजन या सीरिजमधील स्वस्त स्मार्टफोन आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8GB रॅमला सपोर्ट करतो.

Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 मॅक्स विजन अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माय यूएक्सवर चालतो, जो Android 13 पर्यंत अपडेट केला जाईल.

या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट दिला आहे. या मोटोरोला फोनमध्ये 8GB पर्यांतच रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ