लोकशाही न्यूज नेटवर्क
Xiaomi कंपनीचा Mi10 5G स्मार्टफोन आता स्वस्त झाला आहे. 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या आपल्या Mi 10 5G स्मार्टफोनच्या किमतीत कंपनीने पाच हजार रुपयांची कपात केली आहे. mi10 5G फोनमध्ये 3D कर्व्ह्ड डिस्प्ले , क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असे शानदार फिचर्स आहेत.
रॅम : Mi 10 5G भारतात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, व 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
डिस्प्ले : या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
ड्युअल-सिम सपोर्ट : ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला Mi 10 5G हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असतो.
कॅमेरा : या फोनचा मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच यात शूटस्टेडी मोडही आहे. याशिवाय दुसरा कमेरा 13 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच Mi 10 मध्ये 4,780 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली बॅटरी आहे.
नवीन किंमत : किंमतीच पाच हजार रुपयांची कपात झाल्याने आता Xiaomi Mi 10 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 44 हजार 900 रुपये झाली आहे. तर, 12जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 49 हजार 999 रुपये झाली आहे.