'बॅटल ग्राऊंड्स मोबाइल इंडिया' हा खेळ अधिकृतपणे लाँच झाला नसला तरी एपीके फाईल्सचा वापर करून हा गेम खेळला जात आहे. मागील वेळीबंदी आल्याने या गेमची निर्माती असलेल्या क्राफ्टन कंपनीने टेन्सेंट कंपनीशी संबंध तोडल्याचा दावा केला आहे.मात्र, अजूनही क्राफ्टन कंपनी टेन्सेंटच्या सर्व्हरवरच काम करत असल्याचे समजते.
काय आहे एपीके ? :
▪️ एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज आहे. अँड्रॉइड आणि गुगलच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एपीके असते.
▪️ काही ॲप्स गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध नसतात. मात्र, ते एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड करता येते.
▪️ एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड होणारे ॲप्स बेटा स्टेजवर असतात.
▪️ त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती चोरली जाण्याचा धोकाही आहे.सीएआयटीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून 'बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया' गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहेदरम्यान, या खेळामुळे वापरकर्त्यांची माहिती इतर देशात पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे सीएआयटीचे म्हणणे आहे.