Laptop-Computer: भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लॅपटॉप आणि कॉम्प्युटर 'मेड इन इंडिया' असणार आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात लॅपटॉप आणि कॉम्प्युटर स्वस्त दरात खरेदी करता येतील. भारत सरकारने चालवल्या जाणार्या प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत HP, Lenovo आणि Dell यासह 27 कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
पुढील सहा वर्षांत या PLI योजनेंतर्गत 3.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री होण्याची शक्यता आहे. यानंतर या कंपन्यांना आयटी हार्डवेअरसाठी सरकारने आणलेल्या 17 हजार कोटी रुपयांच्या पीएलआय (PLI) योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला 2500 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळण्याची अपेक्षा होती, पण फक्त 120 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळाले. पीएलआयच्या दुसऱ्या टप्प्यात आयटी हार्डवेअरमध्ये 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीचे प्रस्ताव आले आहेत.