तंत्रज्ञान

केरळचा ऑटो ड्रायव्हर सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Published by : Lokshahi News

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वत्र व्हायरल होते. खरं तर, सोशल मीडियावरील काही पोस्ट अत्यंत मनोरंजनात्मक असतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

केरळमधील एका ऑटोवर Paulo Coelho असे लिहून खाली मल्याळममध्ये लिहिले आहे की, 'अल्केमिस्ट' आता या ऑटोचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रसिध्द लेखक Paulo Coelho यांनी स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, 'केरळ, भारत (फोटोसाठी खूप खूप धन्यवाद).' फोटोमध्ये दिसणाऱ्या ऑटोच्या नंबर प्लेटवरून दिसून येते की हा ऑटो एर्नाकुलमच्या आऱटीओ प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे.

ऑटोरिक्षा मालक केए प्रदीप ट्विटरवर सक्रिय नाहीत. पण जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्याला त्याच्या ऑटो ट्वीटबद्दल सांगितले, तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून अनेकांनी प्रदीपची स्तुती करायला सुरुवात केली. एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रदीपला पुस्तके वाचण्याची आवड आहे. या छंदामुळे 55 वर्षीय प्रदीपने Paulo Coelho ची 10 पुस्तके वाचली आहेत. प्रदीप 25 वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवत आहेत.

जेव्हा प्रदिप यांच्या ऑटोचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा प्रदीप हे खूप आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, "माझ्यासाठी हे खूप मोठे आश्चर्य होते. माझ्या आवडत्या लेखकाने माझ्या ऑटोरिक्षाबद्दल ट्विट केले हे जाणून मला खूप आनंद झाला आहे. "तसेच, त्याने Paulo Coelho भेटण्याची इच्छा व्यक्त केली.! Paulo Coelho हे सध्या सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत, त्यांची पुस्तके जगभरात प्रचंड वाचली जातात. पण प्रदीपमध्ये दिसणारी त्याच्या पुस्तकांची क्रेझ काही वेगळीच आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news