Railway|IRCTC Ticket Booking Team Lokshahi
तंत्रज्ञान

खात्यातून पैसे कटले पण रेल्वेचे तिकीट बुक झाले नाही, जाणून घ्या आता काय करायचे?

त्यामुळे अनेक वेळा तिकीट बुक करताना बुक केले जात नाही परंतु...

Published by : Shubham Tate

IRCTC Ticket Booking : आयआरसीटीसी वेबसाइटवरून तिकीट बुक करताना, अनेक वेळा असे घडते की बँक खात्यातून पैसे कापले जातात, परंतु तिकीट बुक होत नाही. मग आपण काय करावे? तुम्हाला परतावा मिळेल का, आणि कसा मिळवाचा जाणून घ्या. (irctc ticket booking payment done but ticket not book know here what to do now payment options on irctc)

IRCTC वर पेमेंट पर्याय

IRCTC हे प्रवाशांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग (ticket booking) आणि रद्दीकरण प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्हाला तिकीट बुकिंग आणि पेमेंटसाठी वेगवेगळे पर्याय मिळतात. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार हे पर्याय वापरू शकतात. तिकीट बुकिंग आणि पेमेंटसाठी नेट बँकिंग, (Banking) डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ई-वॉलेट, डिजिटल वापरता येईल.

पेमेंट झाले तिकीट बुक नाही

आयआरसीटीसीच्या ई-तिकीटिंग वेबसाइटवर तिकीट बुक करताना अनेक वेळा वापरकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते, कारण दर सेकंदाला हजारो लोक वेबसाइटवर तिकीट बुक करत असतात, त्यामुळे वेबसाइटवर लोड खूप जास्त असतो, त्यामुळे अनेक वेळा तिकीट बुक करताना बुक केले जात नाही परंतु खात्यातून पैसे कापले जातात.

बुकिंगच्या वेळी प्रवासी बर्थ निवडतो तेव्हा असे घडते, परंतु बर्थ उपलब्ध नसल्यामुळे तिकीट बुक केले जात नाही. नेटवर्कचा अडथळा हे देखील एक कारण बनू शकते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्याचे पैसे त्यांच्या बँक खाते, क्रेडिट कार्डमधून कापले जातात. IRCTC वरून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी 2-3 दिवस लागतात. हे पैसे वापरकर्त्याच्या बँक खात्यात आपोआप परत येतात, यासाठी वापरकर्त्याला काहीही करण्याची गरज नाही.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...