तंत्रज्ञान

इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ...

महिलांच्या संख्येतही कमालीची वाढ

Published by : Saurabh Gondhali

मेरा देश बदल रहा है! सध्या देशातील शहरी भागांसह गाव-खेड्यांमध्येही इंटरनेटच्या (Internet) सक्रिय वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे आता तर सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत ग्रामीण भागाने शहरांवरही मात केली आहे. शिवाय, गेल्या दोन वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्या महिलांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली असून महिलांनी याबाबतीत पुरुषांना मागे टाकले आहे. एका डेटा आणि मार्केट रिसर्च फर्मने ( Data and Market Research Ferm) केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

दोन वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्या महिलांच्या संख्येत ६१ टक्क्यांची वाढ, तर पुरुषांची संख्या या काळात केवळ २४ टक्क्यांनी वाढली. खेड्यांमधील ३ पैकी १ महिला सक्रियपणे इंटरनेटचा वापर करते. देशभरात २ वर्षांवरील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या डिसेंबर २०२१ पर्यंत ६४ काेटी ६० लाख. खेड्यांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरांच्या तुलनेत २० टक्क्यांनी जास्त ग्रामीण भागात ३५ काेटी २० लाख इंटरनेट वापरकर्ते शहरी भागात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २९ काेटी ४० लाख.

परवडणारे स्मार्टफोन आणि परवडणारा मोबाईल डेटा उपलब्ध करून डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. डेटाची किंमत सर्वात कमी असलेल्या देशांच्या शीर्ष यादीमध्ये आपला देश समाविष्ट आहे, त्यामुळे इंटरनेटचा वापरदेखील वाढलाय. या सर्वेक्षणामुळे ग्रामीण भारताचीही तंत्रज्ञानाचा अधिक वेगाने वापर करण्याची इच्छा असल्याचे स्पष्टपणे दिसते. 2019 च्या तुलनेत खेड्यांमध्ये इंटरनेट वापरात 45 टक्के वाढ झाली आहे. तर शहरांमध्ये केवळ 28 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड