Apple कंपनीचा दरवर्षी महत्त्वाचा कार्यक्रम खासकरुन लेटेस्ट आयफोनची लाँचिंग दरवर्षी सप्टेंबरच्या आसपास होत असते. दरम्यान लीक झालेल्या रिपोर्टनुसार, यंदा 15 सप्टेंबरला Apple चा यंदाचा इव्हेंट होण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये Apple iPhone 15 सीरीजचे 4 मॉडेल लाँच करू शकते.
अॅपलदरवर्षी एक मेगा इव्हेंट आयोजित करते. या कार्यक्रमातच कंपनी आपला लेटेस्ट आयफोन लाँच करत असते. हा कार्यक्रम बहुदा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात होतो. पण लाँचची तारीख ही वेगवेगळी असते. यंदा आयफोन 15 लाँच होणार असून या फोनची अनेकांना प्रतीक्षा आहे. अशामध्ये लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी Apple इव्हेंट हा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. आयफोन 15 चे चार माॅडेल्स दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आयफोन 15 सीरीजमध्ये चार मॉडेल लाँच केले जातील. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. याशिवाय अॅपलवॉच लाँच करण्यात येणार आहे.
आयफोन 15 मध्ये सी टाईप चार्जिंग दिला जाऊ शकतो. त्यात 48 एमपी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकत. याशिवाय ए 16 बायोनिक चिपसेटला सपोर्ट करता येईल. आयफोन 15 च्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलंड फीचर दिले जाऊ शकते.