Block Unwanted Ads: आजकाल स्मार्टफोन जवळपास प्रत्येक व्यक्ती वापरत आहे. त्यात अनेक फिचर्स आहेत. यामुळे आपले काम सोपे होते, परंतु ही आरामदायी गोष्ट कधीकधी अडचणीत आणते. यातीलच महत्वाचे म्हणजे स्मार्टफोनवरील ब्लिंकिंग जाहिराती. अनेकदा ही समस्या तुम्हालाबी आली असेल. तुमच्या फोनमध्ये अशा जाहिराती येऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. तुम्ही या ट्रिक्स वापरून अशा प्रकारच्या जाहिराती टाळू शकता.
या सोप्या ट्रिक्सचा करा वापर
बहुतेक प्रकरणांमध्ये, फोनवर जाहिरात Google Chrome ब्राउझरमुळे येते. आज आम्ही तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला कोणतेही अॅड ब्लॉकर्स डाउनलोड करावे लागणार नाहीत. तुम्ही काही सेटिंग्ज बदलून या प्रकारच्या जाहिराती थांबवू शकता.
सर्वप्रथम तुमच्या फोनवर क्रोम ब्राउझर उघडा. येथे तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील. त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला सेटिंगचा पर्याय दिसेल. येथे खाली स्क्रोल करा आणि साइट सेटिंगवर जा.
आता Pop-ups आणि redirects वर क्लिक करा. येथे तुम्हाला एक टॉगल दिसेल. हे टॉगल चालू करा. आता तुम्ही साइट सेटिंग पेजवर परत जा.
यानंतर, येथे जाहिरातींचा पर्याय दिसेल. आता येथे तुम्हाला पॉप-अप ब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल. हे सुरु करा.
हे सेटिंग सुरु करून, तुम्ही बहुतांश पॉप-अप आणि अनवॉन्टेड जाहिराती ब्लॉक करू शकता.
या पर्यायांव्यतिरिक्त, जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर जाहिराती पूर्णपणे ब्लॉक करायच्या असतील, तर थर्ड पार्टी अॅप्स किंवा एक्सटेंशन वापरा.
तुम्हाला हवे असल्यास, Chrome ऐवजी इतर ब्राउझर वापरा. असे अनेक ब्राउझर आहेत ज्यात जाहिरातींची अडचण नाही. या ब्राउझरमध्ये तुम्हाला आणखी अनेक वैशिष्ट्ये मिळतील.