तंत्रज्ञान

Google Doodle द्वारे पहिल्या भारतीय महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान

Published by : Lokshahi News

शिक्षिका आणि महिलांच्या न्याय, हक्कांसाठी लढणार्‍या फातिमा शेख यांच्या कार्याला गूगल कडून आज वंदन करण्यासाठी खास डूडल साकारण्यात आले आहे.

आज डूडलवर झळकणार्‍या फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. दीनदुबळ्या आणि गरीबांच्या शिक्षणाला विरोध केल्याने फुले दाम्पत्याला वडिलांनी घराबाहेर काढले तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा यांनी त्यांना आश्रय दिला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दार उघडणार्‍या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा वसा फातिमा शेख यांनी पुढे चालवला. शेख यांच्या घरी स्वदेशी वाचनालयाची स्थापना झाली. इथूनच फातिमा शेख आणि फुले दाम्पत्याने समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले.

कोण आहेत फातिमा शेख ? जाणून घ्या

  • 9 जानेवारी 1831 दिवशी फातिमा शेख यांचा पुण्यात जन्म झाल्ला होता. भाऊ उस्मान शेख सोबत त्या राहत होत्या. जात, धर्म, पंथ, लिंग या स्तरावर भेद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीबाई आणि फातिमा शाळा घेत असतं.
  • सत्यशोधक चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सार्‍यांनाच समाजातील उच्चभ्रू लोकांकडून हीन वागणूक देण्यात आली. मात्र अशा परिस्थितीमध्येही घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फातिमा शेख स्वतः प्रयत्न करत होत्या.
  • भारत सरकारने फातिमा शेख यांच्या कार्याची दखल घेत 2014 साली उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. देशात शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींमध्ये फातिमा शेख हे नाव देखील तितक्याच ठळकपणे घेतले जाते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी