लोकशाही न्यूज नेटवर्क
गुगल लवकरच Google Play Music ही सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. गुगलकडून यासंदर्भात युजर्सना ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी Google Play Music वरील सर्व डेटा डिलिट केला जाईल, असं कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. गुगलने २०११ मध्ये गुगल प्ले म्यूझिक अॅप लाँच केले होते.
कंपनीकडून युजर्सना आपला सर्व डेटा युट्यूब म्युझिकवर YouTube Music ट्रान्सफर करण्याचा पर्याय देत आहे. एकदा डेटा डिलिट झाल्यानंतर पुन्हा तो डेटा रिकव्हर करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही Google Play Music अॅपचा वापर करत असाल तर तुमच्याकडे अजून काही दिवस शिल्लक आहेत.
तुम्ही Google Play Music अॅपचा डेटा डाउनलोड करु शकतात किंवा दुसऱ्या अॅपमध्ये ट्रांसफर करु शकतात. Google Play Music चा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही मोबाइल अॅप किंवा music.google.com वर जाऊ शकतात. त्या अॅपमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी Transfer to YouTube असा पर्याय मिळेल.
असा करा डेटा ट्रान्सफर
गुगल प्ले म्यूझिकवरून यूट्यूब मध्ये ट्रॅक्सला मायग्रेट करू शकता. अॅप ओपन केल्यानंतर Google Play Music No longer Available अशा शब्दात मेसेज येत आहे. या ठिकाणी गूगल प्ले म्यूझिकच्या कंटेंट ला यूट्यूब म्यूझिक मध्ये ट्रांसफ़र करू शकता. तसेच तुम्ही रिकमंडेशन हिस्ट्री डिलीट करू शकता.