दिल्लीच्या द्वारका भागात भरदिवसा एका 17 वर्षीय मुलीवर अॅसिड अटॅक करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फ्लिपकार्टवरून अॅसिड खरेदी केले होते.
दिल्लीच्या द्वारका येथील १७ वर्षीय विद्यार्थीनीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. या घटनेतील मुख्य आरोपींसह ३ जणांनी पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेत मुख्य आरोपी सचिन आरोरा असून, त्याच्यासोबत हर्षित अग्रवाल आणि वीरेंद्र सिंह हे दोघे देखील होते. आरोपींनी ऑनलाइन अॅसिड मागवले होते. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्य आरोपीची चौकशी केली असता मिळालाल्या माहितीनुसार, सचिनने पीडितेशी सप्टेंबर महिन्यात मैत्री केली होती. तसेच, या आरोपींनी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून अॅसिड खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्टला नोटीस बजावली आहे. तसचे, दिल्ली महिला आयोगाने देखील बेकायदेशीररित्या अॅसिड विक्री केल्याने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला नोटीस बजावली आहे.