आता फेसबुकनेही आपल्या ग्राहकांसाठी व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा आणली आहे. फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. वेब-आधारित व्हेरीफिकेशनसाठी युजर्सला दर महिन्याला 11.99 डॉलर्स ( 992 रुपये) आणि iOS वरील सेवेसाठी 14.99 डॉलर्स (1240 रुपये) दरमहा द्यावे लागतील. अशी माहिती झुकरबर्ग याने दिली आहे. भारतात तुम्ही 900 रुपये खर्च करून ट्विटरची ब्लू टिक मिळवू शकता. मात्र भारतीय यूजर्सना फेसबुक ब्लू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार? याची लवकरच माहिती मिळेल.
एलॉन मस्कयांच्या पावलावर पाऊल ठेवत फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आता ब्ल्यु टिक साठी नवा नियम आणणार आहे. ही सेवा या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होणार आहे. टप्या टप्पाने ही सेवा सर्व देशांत सुरू केली जाणार आहे. भारतात ही सेवा कधीपासून लागू होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आली आहे.
याची माहिती देत मार्क झुकरबर्ग म्हणाला की, "या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉन्च करत आहोत, ही की सबस्क्रिप्शन सेवा तुमचे सरकारी आयडी व्हेरिफाईड करून सुरु करू शकाल.फेसबुक वापरकर्ते ब्लू टिक आणि बनावट खात्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी थेट या सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे आता फेसबुकच्या ग्राहकांसाठी व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा असून या साठी ट्विटर पेक्षाही अधिक पैसे वापरकर्त्यांना द्यावे लागणार आहे.